साकेगाव ग्रामपंचायतीचे चार सदस्य अपात्र

जळगाव प्रतिनिधी । अभिलेखामध्ये बेकायदेशीररित्या फेरफार केल्याप्रकरणी भुसावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, सुरेश शंकर पाटील, माणिक भादू पाटील, सुनीता डिगंबर पाटील व अरुणा बळीराम सोनवणे हे २०१५ पासून साकेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्यांनी मुदतीत कराचा भरणा केलेला नाही. तसेच शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदावरून अपात्र करण्यात यावे, याबाबत प्रवीण मोहन सोनार यांनी चौघांसह मीना गजानन सपकाळे यांच्याविरुद्ध जिल्हाधिकार्‍यांकडे विवाद अर्ज सादर केला होता. मीना सपकाळे यांनी कराचा भरणा केल्याचे आढळून आल्याने त्या सदस्यपदी कायम राहिल्या. तर सुरेश पाटील, माणिक पाटील, सुनीता पाटील व अरुणा सोनवणे यांना ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास अपात्र घोषित केले आहे. यासोबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, माहिती अधिकारांतर्गत कागदपत्रे देण्यास विलंब केल्याप्रकरणी ग्रामसेवकाविरुद्धही कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत.

Protected Content