Home क्राईम दूध डेअरी फोडून ९३ हजारांची रोकड लांबविली ; कासोदा पोलीसात गुन्हा दाखल

दूध डेअरी फोडून ९३ हजारांची रोकड लांबविली ; कासोदा पोलीसात गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील सुभाष को-ऑपरेटिव्ह दूध डेअरीमध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून डेअरीतील कपाटाचे लॉकर तोडून एकूण ९३ हजार ६७९ रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निपाणे गावातील सुभाष को-ऑपरेटिव्ह दूध डेअरीचे कामकाज संपवून रात्री डेअरी बंद करण्यात आली होती. २१ मार्च रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डेअरी दुकान फोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटाचे लॉकर शिताफीने तोडले. या लॉकरमध्ये ठेवलेले दूध विक्रीचे ७० हजार १७९ रुपये, गुरांच्या औषध विक्रीचे ३ हजार रुपये आणि पशुखाद्य विक्रीचे २० हजार ५०० रुपये, अशी एकूण ९३ हजार ६७९ रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार रविवारी २२ मार्च रोजी सकाळी लक्षात आल्याने डेअरीचे सचिव किरण शिवाजी पाटील वय ४६ रा. कासोदा यांनी कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कौतिक पाटील हे करत आहेत.


Protected Content

Play sound