Home Cities अमळनेर वाईन शॉपमधून रोकड आणि बिअरसह डीव्हीआरची चोरी !

वाईन शॉपमधून रोकड आणि बिअरसह डीव्हीआरची चोरी !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गलवाडे रोड परिसरातील एका वाईन शॉपमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि काउंटरमधील रोख रकमेसह महागड्या बिअरचे बॉक्स आणि पुराव्यासाठी महत्त्वाचा असलेला सीसीटीव्ही डीव्हीआर देखील चोरून नेला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश भगवान पाटील (वय ४४, रा. अमळनेर) हे माजी सैनिक असून त्यांचे गलवाडे रोडवरील साई पेट्रोल पंपाशेजारी ‘केशरी बिअर व वाईन शॉपी’ नावाचे दुकान आहे. २१ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता राकेश पाटील नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकानाचे शटर वाकवलेल्या अवस्थेत दिसले. दुकानात प्रवेश केल्यावर त्यांना काउंटरमधील ड्रॉवर (लॉकर) तुटलेला आढळला. चोरट्यांनी दुकानातून बिअरचा बॉक्स, सिसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर आणि रोकड असा एकुण ३० हजार ४४० रूपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनंतर राकेश पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय सुर्यवंशी हे करीत आहे


Protected Content

Play sound