Home क्राईम भरवस्तीत चोरट्यांचा धुमाकूळ! कपाटातील सोन्या-चांदीवर डल्ला

भरवस्तीत चोरट्यांचा धुमाकूळ! कपाटातील सोन्या-चांदीवर डल्ला


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुना खेडी रोड परिसरात एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा आणि लोखंडी दरवाजाची जाळी तोडून कपाटातील तब्बल १ लाख ६१ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरत अशोक खडके (रा. गीताई नगर, जुना खेडी रोड, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. २१ ते २२ मार्च दरम्यान त्यांचे बघर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी भरत खडके यांच्या घराच्या मागील लोखंडी दरवाजाची तारेची जाळी कापून आणि कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचा लॉकर तोडून त्यात ठेवलेले दागिने लंपास केले. यामध्ये १५ हजारांचे चांदीचे ब्रेसलेट, २५ हजारांचे सोन्याचे नाणे, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे तुकडे, चांदीची नाणी आणि जोडवे असा एकूण १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर करत आहेत.


Protected Content

Play sound