सौरव गांगुलीची किती कोटींची संपत्ती ?

sourav ganguly

नवी दिल्ली प्रतिनिधी । बीसीसीआयच्या अध्यक्षपदी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची नियुक्ती करण्यात आली आहे. गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर कॉमेंट्री सोडावी लागणार आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक जाहिराती करण्यावर बंधन येणार आहे. सुखवस्तू कुटुंबातून आलेल्या गांगुलीने तब्बल 354 कोटींची संपत्ती जमवल्याची चर्चा आहे.

गांगुलीच्या नावे कोलकात्यामध्ये आलिशान बंगला आहे. या बंगल्यात डझनभर खोल्या आहेत. या बंगल्याची किंमत सात कोटी रुपयांच्या घरात आहे. याशिवाय 45 कोटींची स्थावर मालमत्ता सौरव गांगुलीच्या नावे असल्याचं म्हटलं जाते. सौरव गांगुलीला महागड्या गाड्यांचाही शौक आहे. त्याच्या ताफ्यात ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज बेंज यासारख्या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांची किंमतही सात कोटींच्या आसपास आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सौरव गांगुली समालोचनाकडे वळला. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाशीही तो निगडीत आहे. स्पोर्ट्स चॅनलवर कॉमेंट्रीचे तो सात कोटी रुपये घेत असल्याचं म्हटलं जातं. इतकं मानधन बीसीसीआयच्या ए प्लस कॅटेगरीतील खेळाडूंनाही मिळत नाही. व्यावसायिक जाहिरातींसाठीही गांगुली तगडं मानधन घेत असल्याची चर्चा आहे. तर ब्रँड एंडॉर्समेंटसाठी गांगुलीला दोन ते तीन कोटी रुपये मोजावे लागतात. इंडियन सुपर लीगच्या “एटलॅटिको द कोलकाता” टीमचा तो सहमालक आहे.

Protected Content