सोने ३५० रुपयांनी वधारले तर चांदी स्थिर

sone darat vath

जळगाव प्रतिनिधी । केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्कात अडीच टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. तर अर्थसंकल्प सादर होताच शुक्रवारी (दि. 5 जुलै) रोजी दुपारी सोने ३५० रुपये प्रती तोळ्याने वाढले. आज (दि.6 जुलै) रोजी सकाळी ३४ हजार ४०० रुपयांवर असलेले सोने दुपारी ३४ हजार ७५० रुपयांवर पोहचले.

याबाबत अधिक माहिती अशी की, ५ जुलै रोजी सकाळी सुवर्ण बाजार सुरू झाला. त्यावेळी सोने ३४ हजार ४०० रुपयांवर होते. सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झाली व काही वेळात सोन्यावर अडीच टक्क्याने सीमा शुल्क वाढविल्याचे जाहीर होताच. सुवर्ण बाजार हादरला. या वाढीव करामुळे भाववाढ लगेच लागू होऊन सोने दुपारी ३४ हजार ४०० रुपये प्रती तोळ्यावरून ३४ हजार ७५० रुपयांवर पोहचले. सोन्याच्या आयातीवर सध्या १० टक्के सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) आकारले जाते आहे. त्यात सरकारने आता अर्थसंकल्पात अडीच टक्क्याने वाढ करून सोन्यावर साडे 12 टक्के सीमा शुल्क लावले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण बाजारात दलाल सक्रीय झाल्याने अगोदरच सोने ३४ हजाराच्या पुढे पोहचलेले आहे. त्यात देखील या वाढीव कराने अधिक भर घातली आहे. अर्थसंकल्पानंतर सोने वधारले असले तरी चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. सकाळी ३९ हजार ५०० रुपयांवर असलेली चांदी अर्थसंकल्पानंतरही संध्याकाळपर्यंत याच भावावर स्थिर होती. सोन्यावरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरून कमी करून ते ७ टक्के करणे अपेक्षित होते. मात्र सरकारने उलट त्यात वाढ केली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव आता प्रती तोळा ३५० ते ४०० रुपयांनी वाढले आहे.

 

Key words : gold price jalgaon, gold price today jalgaon, gold rate today jalgaon, gold rate today in jalgaon, jalgaon gold market, jalgaon gold

Protected Content