अधिवेशनात सामाजिक प्रश्नावर दिवसभर चर्चा व्हावी – राऊत

मुंबई । येत्या अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान सामाजिक प्रश्नासंदर्भात एक दिवसाची चर्चा ठेवावी अशी मागणी  डॉ.नितीन राऊत यांनी केली आहे.

आठवडाभरापूर्वी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एससी, एसटी या घटकांच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी काही सूचना देणारे पत्र पाठवलं होत. यामध्ये नोकऱ्या, बढत्यांचा अनुषेश भरुन काढणे, त्यांच्या विकासासाठी योजनांचे पाठबळ देणे यासंबंधीचं मार्गदर्शन त्यांनी केलं होत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामाजिक न्यायाच्या विषयांवर चर्चा व्हायला पाहिजे, अशी भूमिका उर्जांमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मांडली आहे. 

राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी लढतो आहे, ओबीसी बांधव आपले आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष करतोय, तर एससी, एसटी समाजाचा प्रलंबित पदोन्नतीसाठी लढा सुरु आहे. तर अल्पसंख्याक समाज शिक्षणामध्ये आरक्षणसाठी संघर्षरत आहे. त्यामुळे या सर्व घटकांच्या विषयावर एकदा चर्चा होऊन आमचा महाविकास आघाडीचा  सोशल अजेंडा काय आहे, तो जगापुढे आला पाहीजे. हा यामागचा उद्देश असल्याचं डॉ. नितीन राऊत यांनी म्हटलंय.

 

Protected Content