रेल्वे अपघातात अज्ञात महिलेचा मृत्यू !

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव ते वाघळी रेल्वे लाईन दरम्यान गोवा एक्सप्रेसच्या धडकेत एका अज्ञात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ११ रोजी १२:४० मिनिटांनी उघडकीस आली असून सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटलेली नाही. अशी माहिती रेल्वे स्टेशनचे अपस्टेशन मास्तर सतिष रमेश वंजारी यांनी दिली.

गोवा एक्सप्रेस गाडी क्र. (०२७७९) चाळीसगाव ते वाघळी रेल्वे स्थानक  खांबा क्र. ३२९-१३ ते ३२९-१५ दरम्यान हा अपघात घडला आहे. गोवा एक्सप्रेस लोको पायलट यांनी वॉकी टॉकीच्या सहायाने ही माहिती दिली. अपस्टेशन मास्तर सतिष रमेश वंजारी यांनी त्वरीत शहर पोलिस ठाण्यात संपर्क करून घडलेल्या घटनेविषयी माहिती दिली. पुढील प्राथमिक चौकशी ही पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या आदेशानुसार नितीन सोनवणे (पोना ९३४) व सुभाष घोडेस्वार (पोना १११९) हे करीत आहेत.

 

Protected Content