जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख 21 हजार जणांना कोरोना लसीकरण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख 21 हजार 745 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 15 लाख 28 हजार 56 जणांना पहिला डोस तर 4 लाख 93 हजार 689 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज बुधवारी 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पाठविलेल्या प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 15 लाख 28 हजार 56 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 4 लाख 93 हजार 689 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 20 लाख 21 हजार 745 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 8 लाख 75 हजार 347 तर ग्रामीण भागातील 11 लाख 46 हजार 398 नागरीकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज बुधवार 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

Protected Content