डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करा, अशी मागणी भीम आर्मीचे राज्यप्रवक्ते रमाकांत तायडे यांनी राज्यशासनाकडे केली आहे. अन्यथा, राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देखील देण्यात आला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महान विचार ह्या विश्वाला तारणारे महान क्रांतदर्शी विचार असून त्यांनी आपल्या महान ग्रंथातून , भाषणांतून , लेखातून वैश्विक मानवजातीला नेहमीच मार्गदर्शन केले असून त्यासंबंधी त्यांची विपुल साहित्यसंपदा उपलब्ध असून , महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे हे महान विचारधन जगाच्या अंतिम टोकापर्यंत नेण्यासाठी प्रकाशित करण्याचा विडा उचलला त्यानुसार १५ मार्च १९७५ रोजी राज्यशासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली असून , गेल्या ४४ वर्षांत शासनाने फक्त २२ खंड व ०३ सोअर्स मटेरियल इतकीच साहित्यसंपदा प्रकाशित केली आहे. त्यातच २००६ पासून ते आजतागायत म्हणजे *गेल्या १५ वर्षांत एकसुद्धा ग्रंथ प्रकाशित केलेला नाही. बाबासाहेबांच्या साहित्याला जगभरात प्रचंड मागणीअसून ,बाबासाहेबांच्याच साहित्याचा अभ्यास करून अनेक देशातील सरकारे आपल्या प्रजेच्या प्रश्नांची उत्तरे शोधून कार्यरत आहे तर बाबासाहेब लिखित “प्रॉब्लेम ऑफ रुपी” ह्या ग्रंथाच्या आधारावरच आपल्या देशाची सर्वोच्च बँक असणारी “रिझर्व्ह बँक” स्थापित झालेली आहे.

बाबासाहेबांचे विचार विश्वाला मार्गदर्शन करत असताना त्यांचे अप्रकाशित साहित्य मात्र सरकारी गोदामात धूळ खात पडले असून , *सरकारची ही अक्षम्य घोडचूक आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे भीम आर्मीचे राज्यप्रवक्ते मा.रमाकांतजी तायडे यांनी सांगितले असून वेळप्रसंगी आम्ही भाई चंद्रशेखर आझाद यांच्या क्रांतीप्रेरणेतून उग्र आंदोलन छेडू , असा सज्जड दम सुद्धा मा.रमाकांतजी तायडे यांनी दिला आहे.

 

Protected Content