स्कूल बस दरीत कोसळली : १६ जण ठार

शिमला : कुल्लू जिल्ह्यात शाळेची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १६ जण ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरून घसरली. यात १६ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये काही शाळकरी मुलांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातस्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

या भीषण अपघातात अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असून यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे. तर जखमींमध्ये बसच्या चालकाशिवाय प्रवाशांचा समावेश आहे. शाळकरी मुलं शाळेतून घरी परत होती, त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

Protected Content