अमळनेर-गजानन पाटील | राजस्थानात आज झालेल्या भीषण अपघातात अमळनेर तालुक्यातील सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
अमळनेर तालुक्यातील राजस्थान येथे फिरायला गेलेल्या सहा जणांचा राजस्थान मध्ये झालेल्या कार व कंटेंनेर च्या अपघातात पाच जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ रोजी दुपारी २.४५ वाजता घडली आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब दिवाळीच्या सुटीनिमित्त राजस्थान मधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनर ला धडक लागून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेचे उपचार घेत असतांना मृत्यू झाला.
या अपघात मांडळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक धनराज सोनवणे( वय ५१) व त्यांची पाच वर्षाची मुलगी स्वरांजली यांच्यासह गायत्री योगेश साळुंखे (वय ३०) त्यांचा सात वर्षाचा मुलगा प्रशांत योगेश साळुंखे व एक वर्षाची मुलगी भाग्यलक्ष्मी योगेश साळुंखे असे पाच जण जागीच मयत झाले आहेत. तर धनराज सोनवणे सर यांची पत्नी सुरेखा सोनवणे ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे (वय ५१ रा बेटावद ) व योगेश धोंडू साळुंखे ( रा. पिंपळे रोड अमळनेर ) या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब गाडी क्रमांक एम एच ०४ ,९११४ वर राजस्थान फिरायला जात असताना १३ रोजी दुपारी पावणे तीन वाजता बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनर ला धडक दिल्याने हा अपघात झाला. ही वार्ता येताच परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, मंत्री अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी तातडीने हालचाली करून तेथील जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांशी बोलणे केल्याचे वृत्त आहे. ऐन दिवाळीत झालेल्या या भीषण अपघातामुळे तालुका शोकमग्न झाला आहे.