पादचारी महिलेची सोनसाखळी चोरट्याने लांबवली

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गांधी मार्केट समोरील चौबे शाळेजवळ बाजाराला आलेल्या महिलेल्या गळ्यातून सोनसाखळी कापून लांबविल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सरला गजानन हाडे (वय ३५, रा. कांचननगर) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. सरला हाडे या पायी चालत चौबे शाळेकडून बाजारात जात होत्या. यावेळी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी अर्धवट तुटलेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपासणी केली असता सोनसाखळीतील काही भाग चोरट्याने कापुन नेल्याचे लक्षात आले. सोनसाखळी मधील १० हजार रुपयांचे मणी चोरट्याने लांबवले. दरम्यान, याच घटनेच्या दोन तास आधी दाणाबाजार परिसरातून सरला सुनिल बारी (रा. शिरसोली) यांचीही सोनसाखळी याच पद्धतीने तोडल्याची घटना घडली आहे. या प्ररकणी सरला हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित बाविस्कर तपास करीत आहेत.

Protected Content