जळगावात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । जळगाव रेल्वे क्वॉटर्स परिसरात २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अरविंद कुमार हरीप्रसाद शहा (वय-२६) रा. रेल्वे क्वॉटर्स जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. शहरातील दुध फेडरेशन समोर असलेल्या रेल्वे क्वाटर्स मध्ये राहणारा तरूण अरविंद्र शहा याने गळफास घेतल्याचे आज सकाळी ७.३० वाजता उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. परिसरातील नागरीकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी मयत घोषीत केले. डॉ. सोनवणे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक ओमप्रकाश सोनी करीत आहे. 

 

Protected Content