शिवाजी नगरात घरमालकाला भाडेकरूची जीवेठार मारण्याची धमकी; शहर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या तीन जणांनी घरमालक महिलेला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगर परिसरात राहणारे उषा उत्तम शिरसाट (वय-४५) रा. लाकुडपेठ शिवाजी नगर यांचे स्वत:च्या मालकीचे घर आहे. त्यांच्या घरात कल्पना हिरामण जगताप (वय-४५) ह्या भाड्याने राहतात. घरमालक उषा शिरसाठ १० जून रोजी  यांनी कल्पना जगताप यांना रूम खाली करून देण्याचे सांगितले. याचा राग आल्याने कल्पना हिरामण जगताप, करिश्मा हिरामण जगताप (वय-२५), अक्षय हिरामण जगताप (वय-२३) सर्व रा. शिवाजी नगर यांनी उषा सिरसाट यांना शिवीगाळ करून त्यांच्या लहान बहिणीला अश्लिल शिवीगाळ केली. तर करिश्मा जगताप आणि अक्षय जगताप यांनी चाकू मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेच्या फिर्यादीवरून आज सकाळी शहर पोलीस ठाण्यात तिन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे. 

 

Protected Content