कार-ट्रकमध्ये भीषण अपघात ; चौघे जागीच ठार

kar trak

 

 

 

अहमदनगर वृत्तसंस्था । नगर-दौड महामार्गाजवळी नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद परिसरात रात्री 2:30 वाजेच्या सुमारास ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघात 4 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त कार श्रीगोंदयाहून नगरकडे येत होती. बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ हा अपघात झाला. भरधाव कार पाठीमागून ट्रकला धडकली. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी जखमींना मदत करण्यासाठी धाव घेतली. अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात भिंगार येथील 3 जण जागीच ठार झाल्याने भिंगारवर शोककळा पसरली आहे. तर एक जण वाळकी येथील आहे.

Protected Content