शेततळ्यात बहिण भावाचा बुडून मृत्यू

नगर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शेतातील शेततळ्यात सख्या बहिण भावाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील मोधळवाडी परिसरात उघडकीला आली आहे.

शेततळ्यातून पाणी काढतांना पाय घसरल्याने भावाला वाचविण्यासाठी बहिणीने शेततळ्यात उडी घेतली. दुदैवी या घटनेत दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. जयश्री बबन शिंदे (वय 21 ) आणि आयुष बबन शिंदे (वय 7 ) अशी मृत बहिण भावाची नावे आहेत.

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे घटना घडली आहे. पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. रविवारी ८ मे रोजी सकाळी मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण भाऊ कपडे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. भाऊ शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने मागचा पुढचा विचार न करता शेततळ्यात उडी मारली. या दुदैवी घटनेत बहिण व भाऊ दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.  याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!