श्रीराम पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी : शरद पवार गटातर्फे रावेरातून उमेदवारीचे संकेत

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षातर्फे दावेदार असणारे उद्योजक श्रीराम पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केला असून त्यांचे रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकिट पक्के मानले जात आहे.

एकनाथराव खडसे यांनी शरद पवार गटाची साथ सोडून भाजपमध्ये परतण्याचे संकेत दिल्यानंतर पक्षातर्फे रावेरमधून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. रविवारी पुण्यातील मोदीबागेत याबाबत दुपारी बैठक झाली. यात स्वत: शरद पवार यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. यात रवींद्रभैय्या पाटील व श्रीराम पाटील यांची नावे अंतीम निश्‍चीत करण्यात आली. यानंतर रात्री उद्योजक श्रीराम पाटील यांनी भाजपचा राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश केला.

सूत्रांच्या माहितीनुसार श्रीराम पाटील यांचे नाव रावेरातून पक्षातर्फे उमेदवार म्हणून निश्‍चीत झाले असून आज पत्रकार परिषदेत याची घोषणा होणार आहे. श्रीराम पाटील यांनी गेल्या महिन्याच्या मध्यावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती. आता ते थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, स्वत: शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत श्रीराम पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी प्रा. गोपाल दर्जी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.

Protected Content