लोकांना निवडणुकांच्या तारखा पाहून लस केव्हा मिळेल हे समजणार

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । निवडणूक जाहीरनाम्यात मोफत कोरोना लस घोषणा करून भाजप फसल्याचे दिसत आहे. आता देशातील लोकांना राज्यातील निवडणुकांच्या तारखा पाहून लस केव्हा मिळेल हे समजणार आहे, असा टोला राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारला लगावला आहे

या घोषनेनंतर विरोधी पक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी म्हणतात, ‘भारत सरकारने कोविड लशीची घोषणा केली आहे. लस आणि खोटी वचनांची पूर्ती कधी होणार, हे पाहण्यासाठी कृपया तुमच्या राज्यातील निवडणुकीची तारीख पाहा.’ जेथे निवडणुका असतील तेथेच फक्त लोकांना कोरोनाची मोफत लस मिळेल,

 

या पूर्वी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले. बिहारमध्ये एनडीएचे सरकार आल्यास बिहारच्या सर्व नागरिकांना लस मोफत दिली जाईल, असे वचन भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

कोरोनाची लस ही संपूर्ण देशाची आहे, भारतीय जनता पक्षाची नाही असे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. आमच्याही राज्यासाठी अशी घोषणा का केली जात नाही, असा प्रश्नही इतर विरोधी पक्ष विचारू लागले आहेत.

Protected Content