घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिर होणार खुले

यावल प्रतिनिधी । जिल्ह्यातील प्रसिद्ध निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवीचे मंदिर हे अखेर शासन आदेशाने भाविकांच्या दर्शनासाठी येत्या दि.७ ऑक्टोंबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुले होणार आहे. दरम्यान, या पार्श्वभुमीवर आज प्रशासनाच्या वतीने तहसीलदार महेश पवार व पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या उपस्थित मंदिर विश्वतांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उपस्थित मंदीर विश्वस्तांना तहसीलदार महेश पवार यांनी कोवीड१९च्या नियमानुसार सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत भाविकांना दर्शना करीता परवानगी असेल याची काळजी विश्वस्तांना घ्यावी लागणार असुन नियमांचे योग्यरित्या पालन न झाल्यास प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा सुचना पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी या प्रसंगी दिल्या. बैठकीला यावल एसटी आगाराचे वाहतुक नियंत्रक संदीप अडकमोल, यावल आगाराचे क्लर्क जे. एम. कुरमभट्टी यांना बसेस या कशा पद्धतीने सोडण्यात येतात याची माहीती जाणुन घेतली. दर्शनासाठी सोडण्यात येणाऱ्या प्रवासी वाहतुकी संदर्भात तहसीलदार महेश पवार यांनी रस्ते पाहणी संदर्भात सुचना ही एस. टी. आगाराच्या प्रमुख अधिकारी यांना देण्यात आल्यात.

दरम्यान आज दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता यावल तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या दालनात संपन्न झालेल्या बैठकीत आडगावच्या सरपंच अमिना रशीद तडवी, सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान आडगाव तालुका यावलचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील, सचिव निळकंठ डिगंबर चौधरी, खजिनदार सोपान नथ्थु वाणी, विश्वस्त भास्कर पाटील, चिंधु महाजन, प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चंदन वाणी, योगेश पाटील आदींनी सहभाग घेतला.

 

Protected Content