फैजपूर, प्रतिनिधी | ना. हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांनी येथील दैवत श्री विठ्ठल रुक्मीणी मंदीर व संत श्री खुशाल महाराज देवस्थान यांच्या सभा मंडप उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
थोड्याच दिवसापूर्वी राज्य सरकारकडून ३० लाखांचा निधी मंजूर झाला असून याची प्रशासकीय मंजुरी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगावला प्राप्त झाली आहे. श्री संत खुशाल महाराज हे एका रंगारी समाजात माता नाजुका देवी व पिता तुळशीराम ह्यांच्या घरी साधारणतः २६० वर्ष आधी फैजपूर नगरीत यांचा जन्म झाला. श्रीसंत निळोबा महाराज यांच्या शिष्य पंरपरेत श्रीसंत खुशाल महाराज असताना त्यांना भक्तिची गोडी लागली व भक्ति करत असतांना त्यांना दत्त पादुकांची (खडाव) प्राप्ती झाली. आजही ते खडावं मंदिरात सर्वांना आशिर्वाद देत आहेत.
पुढे पुंढरपुर वारी करत असताना पंढरपुरात खुशाल महाराज यांच्या वर विठ्ठल रुक्मिणी खोटा चोरीचा आळ लागला. त्यावेळी त्यांना दिवाणी कोठडीत ७ दिवस ठेवण्यात आले. पण, महाराज तेथेही विठ्ठल नामस्मरण करत असतांना स्वयंभू पांडूरंग व रूख्मणी मातेची विग्रह पुन्हा महाराज यांच्या हातावर प्रकट झालेत. त्यानंतर महाराज यांची माफी मागत त्यांना मेणाच्या पालखीत फैजपूरला आणले. यातून त्यांची भक्तीत जास्त वाढ झाली. पुन्हा महाराज यांच्यावर त्यावेळेस कर्ज झाले असतांना विठ्ठल भगवान यांनी स्वतः ते कर्ज फेडले होते. त्याची पावती आजही मंदिरात उपलब्ध आहे. स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी विग्रह साक्षात आपल्याला दर्शन देत आहेत. फैजपूरमध्ये १७० वर्षांपासून रथोत्सवाची परंपरा त्यांचे वंशज जोपासत आहे. सदर वास्तु ही पुरातन असून तिचे बांधकाम ब्रिटिश सरकारच्या देखरेखीत झाले आहे. दरम्यान, ना. हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांनी शहराच्या मध्यभागी एक सुंदर आणि टुमदार सभा मंडप उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संत श्री खुशाल महाराज देवस्थान ट्रस्ट व फैजपूर शहरवासीय आणि परिसरातील सर्व भाविकभक्त वर्गात आनंदाचे वातावरण आहे.