विदर्भाची पंढरी शेगावात श्रीराम जन्मोत्सवात भाविकांची अलोट गर्दी

शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘गण गण गणात बोते’च्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव येथे श्री रामनवमीचा उत्सवानिमित्त लाखो भाविक आज शेगावात दाखल झाले आहेत. संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशाच्या काना कोपऱ्यातून भाविक कालपासूनच शेगाव येथे येत आहेत. ७५० पेक्षा अधिक भजनी दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत.

आज सकाळी ५ ला काकडा आरती झाली, तर ७ वाजता मुख्य आरती झाली असून, दुपारी श्रीचां रजत मुखवटा पालखी सोहळा व नगर परिक्रमा होणार आहे. श्री संत गजानन महाराज जेव्हा पासून शेगाव मध्ये आले होते. तेव्हापासूनच शेगावात रामनवमी उत्सव साजरा केल्या जातो. तेव्हापासून आजपर्यंत अव्याहत पणे हा उत्सव सुरूच आहे. आज शेगावात संत गजानन महाराज नगरी रामनवमीचा उत्सव निमित्त भाविकांचा जनसागर पहायला मिळत आहे . संस्थांच्या व्यवस्थापनाकडून काल रात्रीपासून भक्तांसाठी मंदिर खुले ठेवण्यात आले असून, सर्व भक्तासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे, सर्व भक्तांना लवकर व शिस्तीत दर्शन घेता यावे याकरिता सुरळीत व्यवस्था मंदिर च्या वतीने करण्यात आली आहे, ठिकठिकाणी मंदिर चे सेवाधारी उभे असताना दिसत आहेत. तसेच श्रीराम नवमीच्या उत्सवानिमित्त संतनगरी शेगाव सजली असून सर्व मुख्य रस्त्यांवर भगवामय वातावरण पाहायला मिळत आहे, सध्या सकाळी १० .३० वजता दर्शन साठी ३ तासाचा कालावधी लागत असून, मागिल २४, तास पासुन मंदिर भाविकांकरता खुले दुपारी बारा वाजता बारा वाजता श्री राम जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा संस्थांच्या वतीने हर्षवल्लासास साजरा होणार आहे.मुखदर्शनाकरिता २० मिनिटांचा कालावधी लागत आहे. प्रशासनाच्या वतीने सुद्धा भाविकांची गर्दी पाहता पोलिसांचा चोख बंदोबस्त जागोजागी लावण्यात आला आहे. मागील दोन वर्षाच्या मागील दोन वर्षाच्या कोरोना निर्बंधनानंतर प्रथमच लाखोच्या संख्येने भाविक विदर्भाच्या पंढरी श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करण्याकरता दाखल झालेले आहे .मोठ्या प्रमाणात पारंपारिक पाल लावून इथे यात्रा भरण्यात आली आहे. यामध्ये घरगुती उपयोगी साहित्य लाकडी साहित्य फुटाणे रेवडी दाणे याचा प्रसाद देखील इथे आज पाहण्यास मिळत आहे. संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .दिवसभर कीर्तन प्रवचन हे देखील मोठ्या प्रमाणात येथे चालणार आहे.

Protected Content