मनसेच्या ठाकरेंनंतर आता ओवेसी पुढे येणार – ना. जयंत पाटील

 

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मशिदीवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा यामुळे राज्यातील राजकारण तापत आहे. आम्हीही परमेश्वराचे भक्त आहोत परंतु, आमच्याकडून कधीही ईश्वरभक्तीचे प्रदर्शन झालेले नाही, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हनुमान चालीसावर दिली.

गेल्या महिना पंधरा दिवसापासून राज ठाकरे चर्चेत आहेत, मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले असून राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. आज शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण होणार आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे एका बाजूने हा आग्रह करणार आणि नंतर काही दिवसानी ओवीसी देखील पुढे येतील, यातून जातीय तणाव निर्माण करण्याचा आणि अघटित घडविण्याची ही सुरूवात आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी पुण्यात हनुमान जयंतीनिमित्त प्रसार माध्यमाशी बोलतांना प्रतिक्रिया दिली .

राज्यात पेट्रोल, डिझेल, सिमेंट, स्टील दरवाढ, दररोजची वाढती महागाई यावर कोणीही चर्चा करीत नाही. पण हनुमान चालीसा भोंगे यावर चर्चा होते. आम्हीपण हनुमान, रामाचे ही भक्त आहोत, पण आम्ही कधीहि प्रदर्शन करीत नाही. सगळ्यांचा सन्मान, समानतेने वागवण्याची परंपरा आहे याला सर्वधर्म समभाव म्हणतात. अंत्यत जाणीवपूर्वक राजकारणासाठी देवांचा वापर करणे हे कधीहि केलेले नाही असेही ना. जयंत पाटील यावेळी म्हणाले.

Protected Content