भाजपा ओबीसी मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जळगावतर्फे आज इच्छा देवी चौफुली येथे सायंकाळी ५ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जळगाव तर्फे आज गुरुवार, दि. १९ मे रोजी इच्छा देवी चौफुली येथे सायंकाळी ५ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून आमदार सुरेश जिल्हाध्यक्ष (राजूमामा) भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष जयेश भावसार यांनी आंदोलन केले.

मध्यप्रदेशला आरक्षण लागू झाल्यानुसार महाराष्ट्र सरकारनेही त्वरित ओबीसी आरक्षण लागू करावे. अशा मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी ओबीसींना न्याय मिळवून देण्यास अयशस्वी ठरल्यास ओबीसी समाज अन्याय सहन करणार नसून तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी प्रभारी ओबीसी मोर्चा जळगाव शहरअध्यक्ष भरत महाजन, ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस भारती सोनवणे, ओबीसी मोर्चा जळगाव शहर अध्यक्ष जय भावसार, ग्रामीण अध्यक्ष संजय महाजन, सरचिटणीस विजय भारी, प्राधिकारी प्रकाश पंडित, धिरज वर्मा, ओबीसी मोर्चा महिला आघाडी अध्यक्ष रेखा पाटील, कैलास चव्‍हाण, संजय भोळे, संदीप पाटील, अरुण सपकाळे, रवींद्र राव, पिंटू तेली, हेमराज फेगडे, प्रल्हाद सोनवणे, प्रमोद वाणी, चेतन चौधरी, कोकिला मोरे, ज्योती बर्गे, शांताराम नारखेडे, गजानन वंजारी, देवेंद्र पाटील, भूषण लाडवंजारी, संपत कोळी, किशोर वाघ, योगेश पाटील, विजया राऊत, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content