दुय्यम रेशनकार्ड बनविण्यासाठी चारशे रूपयांची लाच घेणाऱ्या पंटरला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुने व जीर्ण झालेले रेशनकार्ड नवीन बनवून देण्यासाठी ४०० रूपयांची लाच घेणाऱ्या तरूणाला जळगाव लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “तक्रारदार यांचे जुने व जीर्ण रेशनकार्ड झाल्याने नव्याने दुय्यम नवीन प्रत मिळण्यासाठी जळगाव तहसील कार्यालयात अर्ज घेवून गेले होते. त्याठिकाणी खासगी व्यक्ती पराग पुरूषोत्तम सोनवणे (वय-३९) रा. खोटे नगर, जळगाव यांनी रेशनकार्डची दुय्यम प्रत हवी असेल तर ४०० रूपयांची मागणी केली.

दरम्यान, तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागात याची माहिती दिली. त्यानुसार गुरूवार १९ मे रोजी दुपारी लाचलुचपत विभागाने सापळा रचून संशयित खासगी पंटर पराग पुरूषोत्तम सोनवणे याला ४०० रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे.

यांनी केली कारवाई –

पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.

Protected Content