मुक्ताईनगर येथे गरजूंना ब्लॅन्केट वाटप

मुक्ताईनगर प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरात हिवाळ्यात थंडीपसून बचाव म्हणून गरजूंना ब्लॅन्केट वाटप करण्यात आले.

मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुक्ताईनगर शहरात गेल्या १४ वर्षांपासून संत महापुरुषांच्या विचार कार्यावरील चालणारी, ‘मानवसेवा हिच ईश्वरसेवा’ हे तत्व जोपासणारी ‘संत रामभाऊ पुजारीबाबा सेवाभावी ट्रस्ट’अंतर्गत ‘रामरोटी आश्रमा’सह इतर सेवभावी नागरिकांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही हिवाळ्यात गरजूंना ब्लॅन्केट वाटप करण्यात आले.

डॉ तुषार पाचपांडे, डॉ एन जी मराठे आणि रामरोटी आश्रम यांच्या संयुक्तपणे पंचक्रोशीतील वंचित, निराधार, बेघर साधुफकीर, गोरगरीब लोकांना सेवाधर्म या अनुषंगाने थंडीचे 30 ब्लॅन्केट वाटप करण्यात आले.याप्रसंगी आपल्या परिवाराकडून निरंतर मानवसेवा घडत राहो ही प्रार्थना दात्यांनी व्यक्त केली.

Protected Content