सावदा, ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावद्यातील श्री. स्वामीनारायण मंदिर आणि सोमवारगिरी मढी देवस्थानास तीर्थक्षेत्र पर्यटक स्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केली.
आज दिनांक १७ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत येथील पालकमंत्री तथा नियोजन मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी शंभर वर्षापूर्वीची परंपरा असलेले मोठा आड परिसरातील श्री.स्वामीनारायन मंदिर आणि कमल टॉकीज समोरील श्री.सोमवरगिरी मढी देवस्थान यास तीर्थक्षेत्राच्या दर्जाची घोषणा केली.
जळगाव जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज शुक्रवार रोजी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे मागणीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत हे जाहीर करण्यात आले.
येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामीनारायण मंदिर व सोमवार गिरी मढी देवस्थान असून येथे दरवर्षी येथे मोठे उत्सव उत्साहात होत असतात. त्या वेळी येथे भाविक दर्शनार्थ येत असतात.येथील परिसराचा विकास व्हावा. या अनुषंगाने सोमवार गिरी मढीचे विश्वस्थ कृष्ण गिरीजी महाराज, स्वामींनाराय मंदिराचे धर्मप्रसाद दासजी, कोठारी राजेंद्र प्रसाद दासजी, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, शिवसेना सचिव शरद भारंबे, युवासेना प्रमुख मनीष भंगाळे, भरत नेहते, निलेश खाचने, शिवाजी भारंबे, बापू भारंबे, अतुल नेमाडे यांनी हे मंदिर तीर्थक्षेत्र पर्यटक स्थळ घोषित करावे. याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत लावून धरली ती आज प्रत्यक्षात उतरली. शहरातील खंडेराव संस्थान मंदिरानंतर आज दोन देवस्थान तीर्थक्षेत्र पर्यटक स्थळ घोषित झाले याबाबत संस्थान आणि नागरिक यांनी आभार मानले.