रोझोदा येथे सोमवारी एकदिवसीय भव्य संगीतम महारूद्र अभिषेक सोहळ्याचे आयोजन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  सावदा येथून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र जागृत श्री कामसिद्ध मंदिर येथे महारुद्र अभिषेक कार्यक्रमाचे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी  आयोजन केले आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र रोजदा व श्री कामसिद्ध मंदिर संस्थान यांनी केली आहे.

गेल्या वर्षी या एकदिवसीय  कार्यक्रमात ४ हजार भाविकांची  उपस्थिती होती. हा कार्यक्रम तिसऱ्या श्रावण सोमवार ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल तरी सर्व या धार्मिक पवित्र महारुद्रास पूजेस बसणाऱ्या भाविकांनी सोबत स्वामी समर्थ नित्यसेवा, अभिषेक पात्र, तामण, पाण्याची बाटली, पाट, १०८ बेलपत्र, आसन, चमचा, तांब्याचा तांब्या, शिवलिंग, महामृत्युंज यंत्र, जपमाळ व हळद-कुंकू, अष्टगंध, अक्षता, अत्तर, कापूर, जानव, शिवमूठ, मूग, भस्म, नारळ इत्यादी घेऊन सकाळी अभिषेक करणाऱ्या भाविकांनी  उपस्थित राहावे.

हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ केंद्र रोझोदा आणि श्रीराम मंदिर व श्री कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. तरी सर्व भाविकांनी वेळेवर उपस्थित राहावे व या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content