आंतरराष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंहचा भाजपमध्ये प्रवेश

पटना । बिहारमधील दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांनी आज (दि.४ ऑक्टोबर) रोजी भाजपात प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. श्रेयसी सिंह सुवर्ण पदक विजेत्या शूटर आहेत.  

अनेक दिवसांपासून  श्रेयसी सिंह राजकारणात प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. सुरवातीला त्या आरजेडी पक्षात प्रवेश करतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आज त्या भाजप पक्षात प्रवेश करत आपल्या राजकारणाचा प्रवास सुरू करणार आहेत. श्रेयसी सिंह आंतरराष्ट्रीय नेमबाज आहेत. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. त्याचप्रमाणे २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुहेरी ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक जिंकले होते. नेमबाजीमध्ये नशीब आजमावल्यानंतर श्रेयसी सिंह यांनी आपला मोर्चा राजकाराणाकडे वळवला आहे.  आता त्या बांका किंवा जमुई या मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगत आहे.

 

Protected Content