श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर हे संपूर्ण खान्देशात भाविकांचे श्रद्धास्थान (व्हिडीओ)

अमळनेर गजानन पाटील । तालुक्यातील तापी, पांझरा आणि गुप्त गंगा या पवित्र त्रिवेणी संगमावर असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर हे संपूर्ण खान्देशात भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी या तिर्थस्थळावर भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. शेवटच्या श्रावण सोमवारी देखील महादेवाच्या दर्शनासाठी असंख्य भाविकांनी गर्दी केली होती.  श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरातील स्वयंभू महादेव पिंडीवर अभिषेक करीत दर्शन घेतले. पहा याचा लाईव्ह वृत्तांत

 मंदिराची महती

तापी-पांझरा व गुप्त गंगा अशा पवित्र त्रिवेणी संगमावर हे श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर वसले आहे. हे मंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वीचे असून याठिकाणी कपिल मुनीनी मंदिराच्या जागेवर तपस्या केल्याची आख्यायिका आहे. शिवाय कपिल मुनींनीच शिवलिंगाची स्थापना केल्याचेही सांगितले जाते. मंदिराची वास्तू ही पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिर असून उत्कृष्ट शिल्पकलेचा आविष्कार आहे. गेल्या पंधरा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील  बाराबनकीचे महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांनी या तिर्थस्थळावर अखिल भारतीय संत संमेलन घडवून आणले होते. प्रामुख्याने तेव्हापासून हे तीर्थक्षेत्र अधिकच प्रकाशझोतात आले आहे.

मंदिराजवळ तीन नद्यांचा संगम असल्याने तसेच शहादा येथील सुलवाडे बॅरेजच्या बॅक वाटरमुळे येथे मोठ्या प्रमाणात जलाशय तयार झाले आहे. परिणामी वर्षभर येणारे भाविक याठिकाणी नौका विराहाचा आनंद घेत असतात. सद्यस्थितीत या तिर्थस्थळावर विविध प्रकारचे पूजाविधी संपन्न होत असतानाच दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी मुक्कामाची सोय व्हावी, यासाठी भले मोठे असे भक्तनिवासचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे.  यासाठी मंदिराचे सेवेकरी महामंडलेश्वर हंसानंद महाराज तीर्थ व ट्रस्टी निधी व देणगी साठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहे.  

https://www.facebook.com/508992935887325/videos/2814482612175925

 

Protected Content