बिना परवानगी भरला बकरी बाजार ; प्रांताधिकारी थोरबोले यांचे कारवाईचे आदेश (व्हिडिओ)

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कृषी उपन्न बाजार समिती उपबाजार पाडळसे,शिवार भोरटेक मध्ये सकाळी ८:०० वाजेला बकरा बाजार भरविला. याबाबत प्रांताधिकारी थोरबोले यांना विचारणा केली असता प्रशासनाकडून बाजाराला कुठलीही परवानगी देण्यात आलेली नसून बिना परवानगी बकरा बाजार भरविण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. घटनास्थळी पोलीस कर्मचारी पाठवून बाजाराला ताबडतोब बंद करण्याचे आदेश दिले.

सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.जिल्ह्यात सर्व ठिकाणी बकरा बाजार बंद ठेवण्यात आले आहे. यानंतरही जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून दिनांक २२ जुलै रोजी यावल येथील कृषी उपन्न बाजार समिती उपबाजार पाडळसातर्फे बकरा बाजार भरविण्यात आला. मुंबई कोकण, छत्तीसगड, मध्यप्रदेश, विदर्भ तसेच जिल्ह्यातील व्यापारी १०० ते २०० वाहने घेऊन बकारा विकत घेण्यासाठी आलेले होते. दिनांक १ ऑगेस्ट रोजी बकरा ईद असल्याने कुर्बानीसाठी बकरा चढविण्याची प्रथा आहे.दरवर्षी फैजपूर येथील कृषी उपन्न बाजार समितीमध्ये बकरा बाजार भरविण्यात येतो यासाठी फैजपूर शहर देशात यासाठी प्रसिद्ध आहे. देशाच्या कानेकोपऱ्यातून खरेदीसाठी लोक येतात. कृषी उपन्न बाजार समितीच्या एक ते दीड किलोमीटरचा परिसर वाहन व बकऱ्यांनी तसेच लोकांनी भरल्याने जत्रेचे स्वरूप दिसते. पण यावर्षी कोरोनामुळे फैजपूर बाजाराला परवानगी न दिल्याने पाडळसा येथे बाजार भरविण्यात आला. आलेल्यासाठी गेटवर सॅनिटायझरची कुठेही व्यवस्था नव्हती. बिना मास्क विक्रेते व खरीददार बिनधास्तपणे फिरत होते.

https://www.facebook.com/watch/?v=630632994251123

 

Protected Content