Home Cities जळगाव स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना भाजपतर्फे अभिवादन

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना भाजपतर्फे अभिवादन

0
50


 

जळगाव, प्रतिनिधी । स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, महान समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे वसंत स्मृती भाजप कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे महनगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते  त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी महानगर सरचिटणीस महेश जोशी, उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, चिटणीस भगतसिंग निकम सर, कार्यालयीन मंत्री प्रकाश पंडित, रेखा कुलकर्णी, नगरसेविका पार्वताबाई भिल, महिला आघाडी अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, सरचिटणीस रेखा वर्मा, नितु परदेशी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष जयेश भावसार, अशोक राठी, कुमार श्रीराम, विशाल जाधव, दुशांत दोशी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.


Protected Content

Play sound