जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून तिच्यावर अत्याचार करून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. मुलीचे वय १६ वर्ष असतांना तिची आई व मामाने जामनेर तालुक्यातील साहिल बाशीर तडवी यांच्याशी व्यक्तीशी ६ जून २०२१ रोजी लग्न लावून दिले. दरम्यान, मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना साहिल याने वारंवार शारीरीक संबंध ठेवल्याने पिडीता तीन महिन्याची गरोदर राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात पती सहील तडवी, पीडीतेची आई, पडितेचा मामा, सासू जमिला बाशीर तडवी, सासरे बाशीर तडवी, चुलत मावशी आरीफा तडवी, मुलाचा मामा यांच्यावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.