शिक्षक भरती गैरव्यवहार : ११ संशयितांची उच्च न्यायालयात धाव

चोपडा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अडावद येथील सार्वजनीक विद्यालयातील शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी तिघांना अमळनेर कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरी ११ जणांचा अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्वसाठी धाव घेतली आहे.

संस्थाध्यक्षांची बनावट स्वाक्षरी करून शिक्षक भरती केल्याप्रकरणी येथील सार्वजनिक विद्यालयाच्या निवृत्त मुख्याध्यापिका, मुख्याध्यापक व विद्यमान मुख्याध्यापकांसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणात संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी बाळासाहेब देशमुख, निवृत्त मुख्यध्यापिका मीना देशमुख, जिजाबराव देशमुख, रतिलाल राजकुळे, शांताराम कोळी, संदीप पाटील, रामकृष्ण पाटील, मनोज देशमुख, नंदकुमार देशमुख, विजय कोळी, निवृत्त मुख्याध्यापक सुभाष पाटील यांचा जामीन न्यायाालयाने फेटाळला आहे.

या प्रकरणात शांताराम गवळे, प्रमोद देशमुख, मुख्याध्यापक अशोक कदम यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. तर, ११ जणांना जामीन नाकारला असून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांना हायकोर्टात दिलासा मिळणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content