धक्कादायक : विवाहितेचा सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । अनोरे गावातील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गुरुवारी २१ मार्च रोजी सकाळी अनोरे शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल संतोष पाटील वय-३४, रा.अनोरे ता. धरणगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील वाडीभोकर येथील माहेर असलेल्या विवाहिता शीतल पाटील यांचा विवाह सन २०१३ मध्ये धरणगाव तालुक्यातील अनोरे येथील संतोष पाटील यांच्याशी रीतीरिवाजाप्रमाणे लग्न झालेले आहे. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले. परंतु त्यानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून छळ करण्यास सुरुवात केली वेळोवेळी सुरू असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गुरुवार २१ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आनोरे शिवारातील शेत गट क्रमांक ३०२ मधील संतोष दगा चौधरी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

हे धक्कादायक बाबत घाट उघडकीला आल्यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन एकच गर्दी केली होती. त्यानंतर मयत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार बाकी संतोष हिरामण पाटील, सासु राजपूतबाई हिरामण पाटील, सासरे हिरामण अभिमान पाटील यांच्या विरोधात गुरुवार २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक करीम सय्यद हे करीत आहे.

Protected Content