धक्कादायक ! माढयामध्ये तरूण मतदाराने ईव्हीएम मशीन पेटवलं

माढा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात आज लोकसभा निवडणूकीसाठी तिसऱ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया सुरू आहे. या टप्प्यात माढा लोकसभा मतदारसंघातही मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. या मतदारसंघामधील सांगोला तालुक्यातील बादलवाडीमध्ये ईव्हीएम मशील पेटवण्याची धक्कादायक घटना घडली आहे. बादलवाडी येथे एक तरूण मतदाराने ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ईव्हीएम पेटवण्यामागचं नेमकं कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. दुपारी तीन वाजताची ही घटना आहे. या घटनेमध्ये दोन ईव्हीएम आणि सोबत असलेले बॅलेट हे तांत्रिक साहित्य जळालं आहे. माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशिल मोहिते पाटील यांचा महायुतीकडून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत सामना रंगला आहे.

 

Protected Content