पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील १६ वर्षीय गतीमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तींनी गैरफायदा घेत अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. जन्मापासून ती गतीमंद असल्याने तिला काहीही समजत नाही. दरम्यान, तिच्या गतीमंदाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अत्याचार केला.
दरम्यान तिच्या पोटाचा आकार वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या आईवडीलांनी तिला शासकीय रूग्णालयात तपासणी करण्यासाठी दाखल केले असता पिडीत मुलगी ही चार महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक बाबत समोर आली. तिच्या नातेवाईकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे करीत आहे.