मोठी बातमी : कारागृहातील बंद्याकडून तरूंग अधिक्षकला शिवीगाळ; खिडकीच्या काचाही फोडल्या !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गंभीर गुन्ह्यात जळगाव सबजेलमध्ये दाखल असलेल्या बंद्याने खिडकीचा काचा आणि लोखंडी जाळी तोडून तुरूंग अधिक्षक यांना अर्वाच्च भाषेचा वापर करून शिवीगाळ केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे.  याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी लखन उर्फ गोलू दिलीप मराठे हा न्यायालयाच्या आदेशानुसार ३ ऑगस्टपासून जळगाव कारागृहात आहे. त्यानंतर न्यायदंडाधिकारी जळगाव यांनी १३ ऑक्टोबर रोजीच्या आदेशानुसार त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार जळगाव मुख्यालयातील पथक मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव कारागृहात लखन उर्फ गोलू याला घेण्यासाठी दाखल झाले. दरम्यान, आपली नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे बंदी लखन उर्फ गोलू याचा समजले. त्यानंतर नातेवाईकांच्या मुलाखतीनंतर सर्कल २ मधून बॅरेक क्रमांक ७ मध्ये मुलाखत कक्षाजवळ असलेल्या कारागृह अधिक्षक कार्यालयाच्या मागील बाजूस खिडकीची लोखंडी जाळी हाताने काढली व काच काहाते तोडून तरूंग अधिक्षक ए.आर. वांडेकर यांची आर्वच्च भाषेत बोलून माझी जेलची बदली पोलीसांनीच केली असे म्हणून शिवीगाळ केली. याप्रकरणी वरीष्ठ तुरूंग अधिकारी गजानन विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content