कारण नसतांना १५ वर्षीय मुलाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील फुले मार्केट येथे काहीही कारण नसताना एका १५ वर्षीय मुलाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना गुरुवार २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता घडली होती. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील फुले मार्केट येथील मोकळ्या जागेत राहुल मंगल जोशी (वय-१५, रा. संजय गांधी नगर, सिंधी कॉलनी, जळगाव) हा तरुण कामाचे निमित्ताने २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता जात असताना त्या ठिकाणी दादू नावाच्य नामक व्यक्तीने काही कारण नसताना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील स्टीलचे कळे हे डोक्याला मारहाण केल्याने दुखापत केल्याची घटना घडली आहे. दरम्यान याप्रकरणी राहुल जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दादू (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संगीता खंडारे हे करीत आहे.

Protected Content