दुर्गा मित्र मंडळात महिला व मुलींमध्ये भारतीय संस्कृतीबाबत जनजागृती

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आनंद मित्र महिला दुर्गा मित्र मंडळ मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केले जात आहे. या मध्ये विदेशी संस्कृतीला तिलांजली देत भारतीय संस्कृतीबाबत जनजागृती केली जात असल्याचे पहायला मिळाले.

दररोज महाराष्ट्रीयन गुजराती बंगाली यांच्यासह विविध वेशभूषा करून महिला एकत्रित येऊन गरबा खेळतात.  जातीय सलोखाचे दर्शन या महिला देत असून विविध विषयावर जनजागृती करण्याचं काम जामनेर शहरातील आनंद महिला दुर्गा मित्र मंडळातर्फे करण्यात येत आहे.

त्याचबरोबर आजच्या मुलींनी विदेशी फॅशन अवगत करण्यापेक्षा देशी वेशभूषा परिधान केली, तरी सुंदर दिसेल त्याच बरोबर पब किंवा इतर ठिकाणी जाण्यापेक्षा दुर्गा उत्सव व गणेश उत्सव यांच्यासह देशातील विविध सणांमध्ये सामील होऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आव्हान आजच्या तरुण पिढीतील मुलींना आनंद मित्र दुर्गा मंडळाच्या महिला देत आहे.

Protected Content