विवाहितेला पतीसह सासरच्या मंडळींकडून मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मुक्ताईनगरातील माहेर असलेल्या विवाहितेला काहीही कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी संकेत पाटील (वय-२४) रा. एसएमआयटी कॉलेजजवळ, मुक्ताईनगर, जळगाव यांचा विवाह जामनेर येथील संकेत पुंडलिक पाटील यांच्याशी १० नोव्हेंबर २०१९ रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्न झाल्यापासून पती यांनी काहीही कारण नसताना शारीरिक व मानसिक त्रास देवून मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच सासू आणि सासरे यांनी देखील मानसिक त्रास देऊन शिवीगाळ केले. या त्रासाला कंटाळून विवाहिता जळगाव येथे माहेरी निघून आल्या. सोमवारी ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती संकेत पुंडलिक पाटील, सासु प्रतिभा पुंडलिक पाटील, सासरे पुंडलिक बाबुराव पाटील सर्व रा. वाकी रोड, जामनेर यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश भावसार करीत आहे.

 

Protected Content