जिल्हयात ठाकरे गटाला धक्का; सुरेश जैन यांनी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना दिला जाहीर पाठिंबा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर जळगाव माजी आमदार आणि मंत्री सुरेश जैन यांनी मुंबईहून जळगावात येताच मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

मागील वर्षी माजी मंत्री सुरेश जैन यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून राजकीय संन्यास घेतला होता. त्यातच त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सुरेश जैन हे भाजपच्या वाटेवर आहे अशी चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. याच दरम्यान त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे ठाकरे गटाला जळगावात मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यामुळे आपण पक्षाला पाठिंबा देत आहोत असे यावेळी सुरेश जैन माध्यमांशी बोलताना म्हणाले.
त्यानंतर ११ मे रोजी आज भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री गिरीश महाजन, महायुतीच्या जळगावातून उमेदवार स्मिता वाघ, जळगावचे आमदार राजूमामा भोळे, प्रताप पाटील यांनी सुरेश जैन यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

Protected Content