मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेवेळेस मनसे करणार ‘रास्ता रोको’ – प्रवीण पाटील

download 1 2

पारोळा प्रतिनिधी । येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त दि. 22 ऑगस्ट रोजी येत आहेत. मात्र यावेळी मनसे रास्ता रोको करणार असल्याचे प्रतिपादन मनसे तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले आहे

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचे विरोधात प्रचार करून राज ठाकरेंनी मोदी सरकार धारेवर धरले होते. आणि राज ठाकरेंवर ईडीने नोटीस बजावली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते ईडीच्या चौकाशीस संपूर्ण वेळ व्यस्त असल्यामुळे आणि मुद्दाम त्यांना मानसिक त्रास देण्याचे प्रकार या सरकारने चालवले आहे. म्हणून कोहिनुर कंपनीच्या व्यवहारा संबंधित त्यांना नोटीस बजावली आहे. पण कोहिनुर कंपनीमध्ये भागीदारी त्यांनी 2008 ला काढून घेतली आहे. म्हणून अश्या चौकाशींनी राज ठाकरे घाबरत नाही, कारण वाघाची शिकार कुत्रा नाही करू शकत, वाघ हा वाघच असतो, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्राचे उद्या येत असल्यामुळे मनसे यावेळी पारोळ्यात रास्ता रोको करणार असल्याचे प्रतिपादन मनसे तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले असून कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे ही आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content