चिदंबरम यांच्या जामीनावर सरन्यायाधीश देणार निर्णय

नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या जामीनावर आता सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निर्णय देणार आहेत. दरम्यान, चिदंबरम यांचा शोध घेण्यात येत आहे.

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज चिदंबरम यांनी आपले वकील कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी या अर्जावर निकाल न देता हे प्रकरण त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवलं आहे. त्यामुळं आता चिदंबरम यांच्या जामीनाबाबत सरन्यायाधीश हे निर्णय देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content