नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावातील हॉटेल सावन येथे अंदाजे ८० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आल्याची घटना शुक्रवारी ३० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याबाबत दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत महिलेची ओळख पटवावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, नशिराबाद गावातील हॉटेल सावन समोर शुक्रवारी ३० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारार हॉटेलचे मालक योगेश चव्हाण यांनी फोन करून नशिराबाद पोलीसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीसांनी रूग्णवाहिका घेवून घटनास्थळी दाखल झाले. महिलेला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. महिलेची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू किंवा माहिती मिळाली नाही. मयत महिलेची ओळख पटवावी असे आवाहन नशिराबाद पोलीसांनी केले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.