दहिगावकर दिपाली पाटील यांना शिवश्री राहूलदादा पाटील उद्योगरत्न पुरस्कार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील दहिगाव येथील प्रगतशील शेतकरी भगवान महारु पाटील यांची कन्या दिपाली पाटील व जावई राहुल साहेबराव पाटील यांना अमरावती येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झालेल्या मराठा उद्योजक महाअधिवेशनात शिवश्री राहुलदादा पाटील उद्योगरत्न पुरस्कार २०२४ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दहिगाव तालुका यावल ची कन्या असलेली दिपाली साहेबराव पाटील यांना मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा दहिगाव येथे एका कौटूंबिक छोटे खानी कार्यक्रमात भगवान महारु पाटील प्रगतशील शेतकरी व सागर पाटील चेतन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील विविध क्षेत्रातील मंडळी व पाटील परिवार उपस्थित होता.

Protected Content