शिवसेना सोडून गेलेल्यांची काय गत झाली ते लक्षात घ्या ! : पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”आजवर शिवसेनेला फोडण्याचे अनेक प्रयत्न झालेत. मात्र हा पक्ष सोडलेले पुढच्या निवडणुकीत पडल्याचे सर्वांनी पाहिले आहेच !” अशा शब्दांमधे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज सभागृहात सत्ताधार्‍यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज विश्‍वासदर्शक ठरावावर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषण केले. यात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, त्यांनी अतिशय चांगल्या पध्दतीत राजकीय वाटचाल केली आहे. तथापि, हे सरकार ज्या पध्दतीत सत्तारूढ झाले ते बरोबर नाही. महाविकास आघाडी आकारास येत असतांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचेच नाव होते. मात्र त्यांनी तसे सांगितले नाही. नाही तर आज तेच मुख्यमंत्री असते. तर शिवसेनेतून अनेकदा इतरांनी पक्षत्याग केला तरी हा पक्ष फुटला नाही.

अजित पवार पुढे म्हणाले की, शिवसेनेतून भुजबळ फुटल्यानंतर पुढील निवडणुकीत ते सर्व जण पराभूत झाले होते. शिवसेनेचे नेते फुटले तरी कार्यकर्ते त्यांच्या सोबत जात नसल्याचा इतिहास आहे. यामुळे आता फुटलेल्या नेत्यांनी याचा विचार करून ठेवावा असा इशारा देखील अजित पवार यांनी याप्रसंगी दिला.

Protected Content