मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आज जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी भेट घेतली. यात ठाकरेंनी आगामी वाटचालीबाबत त्यांच्याशी संवाद साधला.
आज जळगाव जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. धरणगावहून सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी काल रात्रीच येथून निघाले होते. पारोळ्याहून शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने तर पाचोर्याहून वैशालीताई सूर्यवंशी या देखील आज उपस्थित होत्या.
जळगाव महानगर कार्यकारिणीतील महत्वाच्या पदाधिकार्यांनीही आज उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यात शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे आदींनी देखील उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधला.