बियाणे व लागवड साहित्य उपअभियानातंर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । बियाणे व लागवड साहित्य उपअभियान अंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम हा घटक राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगाम 2021-22 मध्ये हरभरा व गहु या पिकाचे महाराष्ट्र राज्य बियाणे महामडळ, अकोला यांचेमार्फत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्याकरीता गहु पीकाचा ५ हजार ४०५ क्विंटल लक्षांक व हरभरा पीकाचा १२०० क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेत सहभागी होणेकरीता इच्छुक शेतकऱ्यांनी राज्य शासनाने विकसीत केलेल्या महाडीबीटी  https://agridbtworflow.mahaonline.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन त्यासाठी आवश्यक असणारे ७/१२ उतारा व आधार कार्डसह पोर्टलवर 25 सप्टेंबर, 2021 पूर्वी अर्ज करावा.

तसेच अर्जदार “MahaDBT Farmer” या नावाचे मोबाईल ॲप्लीकेशन तयार केलेले आहे. अर्जदारांने त्याच्या ॲड्रॉईड मोबाईलव्दारा गुगल प्ले स्टोरवर जावून ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे. एकाच मोबाईलवरुन अनेक लाभार्थी कागदपत्रे अपलोड करुन अर्ज करु शकतात. तसेच सामुहिक सेवा केंद्राची मदत देखील घेवू शकतात, तसेच कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास [email protected] या ईमेल किंवा ०२०-२५५११४७९ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. एका शेतकऱ्यास केवळ एक एकर करीताच लाभ घेता येईल.

सदरचे बियाणे अंशत: अनुदानावर केवळ महाबीज यांनी उत्पादीत केलेलया बियाणावरच लागु असेल, तसेच मिळणारे बियाणे हे पुढील हंगामाकरीता वापरण्यासाठी हा ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक घरगुती बियाणे वापरणे सोईचे होईल. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

Protected Content