चाळीसगावात कोरोनाने घेतला एका महिलेचा बळी!

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना येथील शासकीय ट्रामा केअर सेंटर रूग्णालयात उपचारादरम्यान आज एका कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असून शहराची वाटचाल ही हॉटस्पॉट शहराकडे होत आहे. कोरोना बाधीतांना येथील शासकीय ट्रामा केअर सेंटर अर्थात कोव्हीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले जाते. मात्र उपचार सुरू असलेल्या खडकी येथील ३८ वर्षीय महिलेचा  आज अचानक मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी दि.२४ मार्च रोजी सायंकाळी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आज पुन्हा कोरोनाने एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा सावट दिवसेंदिवस गडद होत असून दि. २५ मार्च सायंकाळपर्यंत कोरोना बाधीतांची संख्या एकूण ६१ इतकी होती. कोरोनाचा फैलाव शहरात अधिक होत असून कोरोनाला आटोक्यात आणण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात संचारबंदी लागू केली जाऊ शकते का? याकडे सर्वसामान्य जनतेचा लक्ष लागून आहे.

 

Protected Content